रोहित शर्माने अभिषेक नायरचे मानले आभार   

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने तुफानी कामगिरी करत अर्धशतक ठोकले. रोहितने आता या खेळीबद्दल भारतीय संघाच्या माजी सपोर्ट स्टाफ सदस्य अभिषेक नायरचे आभार मानले. नंतर अभिषेक नायर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अलिकडेच अभिषेक नायरला भारतीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर तो कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला आहे.
 
भारतीय संघातून विश्रांती घेऊन कोलकाता नाईट रायडर्समध्ये परत येण्यापूर्वी अभिषेक नायर भारतीय कर्णधारासोबत पडद्यामागे काम करत होता. क्रिकबझच्या मते, रोहित आणि नायर बर्‍याच काळापासून एकमेकांसोबत काम करत आहेत. खरं तर, १७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रोहितने केलेल्या प्रभावी २६ धावांच्या खेळच्या एक दिवस आधी, दोघेही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी सराव करताना दिसले होते.
वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहितने नाबाद ७६ धावा केल्या. त्यानंतर त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नायरचे आभार मानले. हंगामाच्या सुरुवातीला रोहित खराब फॉर्ममध्ये होता. त्याने ०, ८, १३, १७ आणि १८ धावा केल्या. 
 
सलग दोन प्रभावी डावांनंतर, तो आता फॉर्ममध्ये दिसू लागला आहे.बीसीसीआयने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधून नायरला वगळले. बीसीसीआयने इतर तीन सदस्यांनाही वगळले आहे, ज्यामध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर सोहम देसाई आणि मालिश करणारा अरुण कानडे. असे मानले जाते की हे चौघेही रोहितचे जवळचे आहेत.
 

Related Articles